सान्या मल्होत्रा ​​साडीला दिला मॉर्डन  ट्विस्ट ! 

या फॅशनच्या युगात बी-टाउन दिवा सान्या मल्होत्रा ​​तिच्या अनोख्या फॅशन ने प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

सान्या मल्होत्रा ​​साडीला दिला मॉर्डन  ट्विस्ट ! 

 

या फॅशनच्या युगात बी-टाउन दिवा सान्या मल्होत्रा ​​तिच्या अनोख्या फॅशन ने प्रेक्षकांची मन जिंकत आहे. अलीकडेच ‘मिसेस’ साठी तिला खूप प्रेम आणि कौतुक मिळाल आणि तिने तिच्या या खास लूक्स ची झलक सोशल मीडिया वर शेयर केली आहे. 

सान्याने सोनेरी रंगाची साडी नेसून ब्रेस्टप्लेटसह पारंपारिक ब्लाउज घातला आहे आणि तिचा हा पारंपरिक वेस्टर्न लूक तयार केला आहे.

 

सध्या सान्या मल्होत्रा ​​‘मिसेस’ च्या यशाचा आनंद लुटत आहे. ज्याचा नुकताच मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला. आरती कडव दिग्दर्शित या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले, तर सान्याला प्रामाणिक अभिनयासाठी कौतुक मिळाले. या वर्षाच्या सुरुवातीला, तिला ‘मिसेस’ या मल्याळम चित्रपट ‘द ग्रेट इंडियन किचन’ चा रिमेक असलेल्या तिच्या भूमिकेसाठी न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

‘मिसेस’ च्या पलीकडे सान्या मल्होत्रा ​​‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती वरुण धवन, जान्हवी कपूर आणि रोहित सराफ यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल. तिच्याकडे पाइपलाइनमध्ये ‘ठग लाइफ’ आणि अनुराग कश्यपसोबत एक शीर्षकहीन चित्रपट आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number