वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत – संजय राऊत

मुंबई : मी माफी मागायला राहुल सावरकर नाही, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. यानंतर या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी ट्विटद्वारे प्रत्युतर दिले आहे. काय म्हणाले संजय राऊत ? संजय राऊत ट्विट करत म्हणाले की ‘वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी […]

वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत – संजय राऊत

मुंबई : मी माफी मागायला राहुल सावरकर नाही, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. यानंतर या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी ट्विटद्वारे प्रत्युतर दिले आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की ‘वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत. जय हिंद’.

‘भाजपने ‘मेक इन इंडिया नाही, रेप इन इंडिया केलं, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. या वक्तव्यावरुन लोकसभेत वादावादी पाहायला मिळाली. राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपने केली होती.

‘माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number