सांगली शहर पोलिसांकडून रोडरोमियोंवर कारवाई

सांगली : हैदराबाद येथील घटनेनंतर पोलिसांनी रोड रोमिओ आणि टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांकडून महिला महाविद्यालय आणि कन्या शाळांच्या परिसरात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी आज राजवाडा परिसरात असणाऱ्या कन्या पुरोहित शाळेच्या बाहेर आठ तरुणांवर कारवाई केली आहे. या शाळेच्या बाहेर विनाकारण थांबलेल्या […]

सांगली शहर पोलिसांकडून रोडरोमियोंवर कारवाई

सांगली : हैदराबाद येथील घटनेनंतर पोलिसांनी रोड रोमिओ आणि टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांकडून महिला महाविद्यालय आणि कन्या शाळांच्या परिसरात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी आज राजवाडा परिसरात असणाऱ्या कन्या पुरोहित शाळेच्या बाहेर आठ तरुणांवर कारवाई केली आहे. या शाळेच्या बाहेर विनाकारण थांबलेल्या तीन मोटार सायकल स्वारांवर कारवाई केली आहे.

या कारवाईत शहर पोलीस यांच्यासह वाहतूक शाखा आणि शाळा प्रशासनाचे लोकही सहभागी झाले होते. आजपासून प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या बाहेर विनाकारण थांबणाऱ्यावर कारवाई होणार आहे असे पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number