Samsung vs iPhone: क्रेझ आयफोनची, पण दमदार फीचर्स सॅमसंगचे; सध्या सॅमसंग का ठरतोय लोकप्रिय?

आयफोन कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. योग्य गरजेनुसार फोन निवडणे महत्त्वाचे आहे.

Samsung vs iPhone: क्रेझ आयफोनची, पण दमदार फीचर्स सॅमसंगचे; सध्या सॅमसंग का ठरतोय लोकप्रिय?

आजच्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करताना अनेकजण Apple चा iPhone घ्यावा की Samsung याच्यात गोंधळून जातात. दोन्ही ब्रँड त्यांच्या दर्जेदार उत्पादनांसाठी ओळखले जात असले तरी काही बाबतीत सध्या सॅमसंग iPhone पेक्षा आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती असणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम फोल्डेबल स्मार्टफोनचा विचार केला तर या क्षेत्रात सॅमसंगने मोठी आघाडी घेतली आहे. 2019 पासूनच कंपनीने फोल्डेबल फोन बाजारात आणले असून सतत नवनवीन तंत्रज्ञान सादर केले आहे. दुसरीकडे, Apple ने अजूनही या सेगमेंटमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही. त्यामुळे फोल्डेबल फोन घ्यायचा असेल, तर सध्या सॅमसंग हा मुख्य पर्याय ठरतो.

याशिवाय सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये मिळणारा स्मार्ट पेन हा एक मोठा प्लस पॉइंट मानला जातो. हा केवळ स्टायलस नसून नोट्स लिहिणे, स्केच तयार करणे, प्रेझेंटेशन कंट्रोल करणे अशा अनेक कामांसाठी उपयुक्त ठरतो. iPhone मध्ये सध्या अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत सॅमसंगला आघाडी मिळते.

हेही वाचा: Strait Of Hormuz Toll: हॉर्मुजमध्ये इराणचा 'टोल'चा तगादा; जहाजांसाठी भारताने किती मोजला पैसा? परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं

डिस्प्ले क्वालिटीच्या बाबतीतही सॅमसंगची ओळख वेगळी आहे. त्यांच्या AMOLED आणि Dynamic AMOLED 2X स्क्रीनमुळे उत्तम ब्राइटनेस, जिवंत रंग आणि उच्च रिफ्रेश रेट मिळतो. त्यामुळे व्हिडिओ पाहणे किंवा गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ आणि आकर्षक होतो. यामुळे अनेक युजर्स व्हिज्युअल अनुभवासाठी सॅमसंगला प्राधान्य देतात.

कॅमेऱ्याच्या बाबतीत iPhone त्याची वेगळी ओळख राखून आहे, मात्र सॅमसंगचे फ्लॅगशिप फोनही कुठेही कमी नाहीत. मल्टी-कॅमेरा सेटअप, टेलिफोटो लेन्स, अल्ट्रा-वाइड अँगल आणि 100x पर्यंत झूमसारखी वैशिष्ट्ये फोटोग्राफीचा अनुभव अधिक समृद्ध करतात. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओच्या बाबतीतही दोन्ही कंपन्यांमध्ये चांगली स्पर्धा दिसून येते.

एकूणच, iPhone आणि सॅमसंग हे दोन्ही ब्रँड त्यांच्या ठिकाणी उत्कृष्ट आहेत. मात्र, जर तुम्हाला अत्याधुनिक फीचर्स, फोल्डेबल तंत्रज्ञान आणि अधिक प्रोडक्टिव्हिटी हवी असेल, तर सध्या सॅमसंगकडे काही असे पर्याय आहेत जे त्याला iPhone पेक्षा तुम्हाला चांगला अनुभव देतात. 

हेही वाचा: Mumbai Metro: 'मेट्रो धावली, पण पायऱ्यांचं काम अर्धवट राहिलं…'; सरनाईक-फडणवीसांच्या 'त्या' मिश्किल संवादाची राजकीय वर्तुळात चर्चा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number