समीर वानखेडे राजकारणात?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर त्यांची बदली चेन्नईचे डीजीटीएस अतिरिक्त आयुक्तपदी झाली. दरम्यान, वानखेडे यांनी नागपुरमध्ये संघ मुख्यालयाचा दौरा केला. या दौऱ्यामुळे वानखेडेंवर टीका केली जात असून समीर वानखेडे राजकारणात सक्रीय होणार का, या चर्चेला उधाण आले आहे. […]

समीर वानखेडे राजकारणात?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर त्यांची बदली चेन्नईचे डीजीटीएस अतिरिक्त आयुक्तपदी झाली. दरम्यान, वानखेडे यांनी नागपुरमध्ये संघ मुख्यालयाचा दौरा केला. या दौऱ्यामुळे वानखेडेंवर टीका केली जात असून समीर वानखेडे राजकारणात सक्रीय होणार का, या चर्चेला उधाण आले आहे.

समीर वानखेडे यांनी संघ मुख्यालयाचा दौरा केल्यामुळे ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकारणात होत आहे. यावर, ‘न्यूज डंका’ वेबपोर्टलचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी समीर वानखेडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत वानखेडेंनी होणाऱ्या चर्चेबाबत भूमिका मांडली.

राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर समीर वानखेडे म्हणाले, ‘मी कधीही कोणत्याही चर्चेला घाबरलो नाही. मी करत असलेली सरकारी नोकरी ही माझ्या दृष्टीने देशसेवेचे माध्यम आहे. तर, राजकारण हेदेखील देशसेवेचे माध्यम आहे. देशाची सेवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात राहून करू शकता,’ असे ते म्हणाले.

तसेच, ‘भविष्यात काय होईल याबाबत कोणीही सांगू शकत नाही. मी ठरवून आयआरएस झालो, परंतु त्यानंतर आयुष्यात अनेक न ठरलेल्या गोष्टी घडल्या. त्यामुळे उद्या राजकारणातही जाईन. मात्र, याक्षणी असे काहीही नाही,’ असे म्हणत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला वानखेडेंनी पूर्णविराम दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number