Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजान सिंगलच; सलमान खानच्या लग्नाबाबत वडिलांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, ‘त्याची आई…’

60व्या वर्षीही अविवाहित असलेल्या सलमान खानच्या लग्नाबाबत कायम चर्चा असते.

Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजान सिंगलच; सलमान खानच्या लग्नाबाबत वडिलांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, ‘त्याची आई…’

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग, चाहत्यांचा लाडका आणि सुपरस्टार सलमान खान आज, 27 डिसेंबर 2025 रोजी, आपल्या 60व्या वाढदिवसाचा जल्लोष साजरा करत आहे. दशकानुदशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा सलमान आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र, यश, पैसा आणि प्रसिद्धी असूनही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक प्रश्न कायम चर्चेत राहिला आहे सलमान खान अजूनही अविवाहित का आहे?

या प्रश्नाचं उत्तर एकदा खुद्द सलमानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांनी दिलं होतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, सलमानसाठी योग्य जोडीदार शोधणं हे जवळपास ‘अशक्य’ आहे.

सलीम खान यांच्या मते, सलमान खान अनेकदा त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या प्रेमात पडतो. चित्रपटसृष्टीत सतत एकत्र काम करताना, भावनिक जवळीक वाढते आणि नातं पुढे जातं. मात्र, इथंच खरी अडचण निर्माण होते. सलमानच्या अपेक्षा आणि अभिनेत्रींची स्वप्नं यामध्ये मोठा फरक असतो.

हेही वाचा:Kailash Kher: 'तुम्ही जनावरांसारखं..'; ग्वाल्हेरमधील कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांच्या गोंधळामुळे कैलाश खेर संतापले, कार्यक्रम अर्ध्यातच बंद

सलीम खान यांनी सांगितलं होतं की, सलमानला आयुष्यात अशी पत्नी हवी असते जी घर, कुटुंब आणि मुलांची काळजी घेईल जशी त्याची आई सलमा खान घेत असे. त्याच्या मनात आदर्श पत्नीची प्रतिमा ही ‘घर सांभाळणारी आई’ अशीच आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत येणाऱ्या अभिनेत्रींच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा असतात. त्यांना करिअर घडवायचं असतं, नाव कमवायचं असतं. अशा महिलांकडून पूर्णवेळ घर सांभाळण्याची अपेक्षा ठेवणं वास्तववादी नाही, असं सलीम खान यांनी स्पष्ट केलं होतं.

“सलमान जेव्हा एखाद्या नात्यात गंभीर होतो, तेव्हा तो आपल्या आईची छबी त्याच्या पार्टनरमध्ये शोधतो. पण ते शक्य नाही,” असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या मते, अभिनेत्री लग्नानंतरही अभिनय, शूटिंग आणि सार्वजनिक आयुष्य सोडू शकत नाहीत, त्यामुळे नात्यांमध्ये ताण निर्माण होतो.

हेही वाचा: Revati Lele: ‘मी होकार द्यायच्या आधीच…’ अभिनेत्री रेवती लेले पुन्हा प्रेमात; अंगठीचा फोटो शेअर करत दिली कबुली

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, स्वतः सलमाननेही मान्य केलं आहे की, त्याच्या फारच मोजक्या नाती खरोखर गंभीर होती आणि ती अनेक वर्षं टिकली होती. 2023 मध्ये ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात सलमानने गंमतीशीरपणे सांगितलं होतं की, तो आपल्या प्रेमकथांबाबत आयुष्यभर मौन बाळगेल.

त्याच मुलाखतीत त्याने स्वतःला ‘प्रेमात दुर्दैवी’ असंही म्हटलं होतं. “सुरुवातीला मी नातं तुटलं की समोरच्याला दोष द्यायचो. पण नंतर कळलं की चूक माझ्यातच होती,” अशी प्रामाणिक कबुली त्याने दिली होती.

60व्या वर्षीही अविवाहित असलेला सलमान खान आजही आपल्या कामात, चाहत्यांमध्ये आणि ‘भाई’ या प्रतिमेत तितकाच मजबूत आहे. लग्न झालं नाही, तरी सलमानचं आयुष्य, त्याची लोकप्रियता आणि त्याचा स्टारडम आजही अबाधित आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number