Salman Khan Hair Treatment: भारतात परवानगी नव्हती तरीही… सलमान खान घेत होता ही हेअर ट्रीटमेंट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

त्या काळात स्वतःलाही केस गळतीची समस्या होती. एका कामानिमित्त ते सलमान खानच्या घरी गेले असता त्यांनी एक वेगळेच दृश्य पाहिले.

Salman Khan Hair Treatment: भारतात परवानगी नव्हती तरीही… सलमान खान घेत होता ही हेअर ट्रीटमेंट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याच्या केसांशी संबंधित एका जुन्या उपचाराचा दावा. चित्रपट निर्माते आणि 'सनबर्न फेस्टिव्हल'चे सहसंस्थापक शैलेंद्र सिंह यांनी एका पॉडकास्टमध्ये सलमान खानबाबत असा खुलासा केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी त्यांनी सलमानला त्याच्या घरी पीआरपी (PRP) हेअर थेरपी घेताना पाहिले होते. त्याचबरोबर, त्या काळात भारतात या उपचारपद्धतीला अधिकृत मान्यता नव्हती, असाही दावा त्यांनी केला. सायरस भरुचा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शैलेंद्र सिंह यांनी हा प्रसंग आठवला. त्यांनी सांगितले की, त्या काळात स्वतःलाही केस गळतीची समस्या होती. एका कामानिमित्त ते सलमान खानच्या घरी गेले असता त्यांनी एक वेगळेच दृश्य पाहिले.

शैलेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, सलमान खान आरामात बसून बिर्याणीचा आस्वाद घेत होता. त्याचवेळी हातात ग्लोव्ह्ज घातलेली एक व्यक्ती आली आणि सिरिंजच्या सहाय्याने सलमानच्या टाळूमध्ये इंजेक्शन देऊ लागली. हे पाहून आपण काही क्षण गोंधळून गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सलमानने हसत त्यांना सांगितले की, "स्टार असण्याची किंमत मोजावीच लागते." पुढे त्याने ही पीआरपी हेअर थेरपी असल्याचे स्पष्ट केले. ही उपचारपद्धती केस गळती कमी करण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यास मदत करण्यासाठी केली जाते, असेही त्याने सांगितल्याचे शैलेंद्र यांनी नमूद केले.

शैलेंद्र सिंह यांनी पुढे दावा केला की, त्या काळात भारतात पीआरपी थेरपीला अधिकृत परवानगी मिळालेली नव्हती. तरीही अनेक प्रसिद्ध कलाकार अशा प्रकारचे उपचार घेत होते. मात्र, त्यांनी कोणत्याही इतर कलाकाराचे नाव उघड केले नाही.

पीआरपी (Platelet Rich Plasma) ही केसांच्या वाढीसाठी वापरली जाणारी आधुनिक उपचारपद्धती आहे. या प्रक्रियेत रुग्णाच्या शरीरातून थोडे रक्त घेतले जाते. त्यानंतर विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने रक्तातील प्लेटलेट्स वेगळे करून त्यापासून तयार केलेला प्लाझ्मा टाळूमध्ये इंजेक्ट केला जातो. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते, त्यांची वाढ सुधारण्यास मदत होते आणि केसांची घनता वाढू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, या उपचाराचा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number