‘राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा’

सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९७ जयंती आहे. जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील मान्यवर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना एक पत्र ट्विट केलं आहे. ‘आदरणीय साहेबांच्या जन्म दिनानिमित्त गुरुस्मरण’ असं कॅप्शन त्यांनी आपल्या […]

‘राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा’

सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९७ जयंती आहे. जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील मान्यवर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना एक पत्र ट्विट केलं आहे.

‘आदरणीय साहेबांच्या जन्म दिनानिमित्त गुरुस्मरण’ असं कॅप्शन त्यांनी आपल्या या पत्राला दिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची क्षमा मागितली आहे. बाळासाहेबांची अखेरच्या दिवसांत भेट होऊ शकली नाही म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

नारायण राणे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. ‘आदरणीय साहेबांच्या जन्म दिनानिमित्त गुरुस्मरण’ असं कॅप्शन त्यांनी आपल्या या पत्राला दिले आहे. मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळाले. त्यानी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्याच्यामुळे आहे हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचं वृत्त ऐकल्यानंतर माझ्या हृदयात विचारांचा कल्लोळ उठला. बाळासाहेबांच्या आठवणीने डोळ्यात आश्रू आले. सत्ता असो नाहीतर नसो बाळासाहेब ठाकरे यांना काहीही फरक पडत नव्हता. ते आपल्या बोलण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत असं नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान यापत्रातून नारायण राणे यांनी ठाकरे गटाला देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आपल्याला शिवसेनेतील काही लोकांमुळे शिवसेना सोडावली लागली. बाळासाहेबांनी धर्माबाबत व राष्ट्रीय हिताबाबत कधीही तडजोड केली नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number