रशिया-युक्रेन युद्धाचा सराफा बाजारावर परिणाम

रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून या युद्धाचा परिणाम आता भारतातील सराफा बाजारावर झालेला पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून सोन्याचे दर ५४ हजारांवर पोहचले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत सोमवारी जीएसटीसह सोन्याचे दर ५४ हजार ८०० तर चांदीचे दर प्रतिकिलो […]

रशिया-युक्रेन युद्धाचा सराफा बाजारावर परिणाम

रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून या युद्धाचा परिणाम आता भारतातील सराफा बाजारावर झालेला पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून सोन्याचे दर ५४ हजारांवर पोहचले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत सोमवारी जीएसटीसह सोन्याचे दर ५४ हजार ८०० तर चांदीचे दर प्रतिकिलो ७३ हजार १३० वर पोहचले आहेत.

मागील काही दिवसांपासून रशिया-युक्रेन दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्यामुळे जगभरात गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर

शिया-युक्रेन युद्धाची झळ शेअर बाजाराला बसू लागली आहे. आज, सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही मोठी पडझड झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने गुंतवणूकदार होरपळले आहेत. शेअर बाजार आज दिवसभर अस्थिर राहण्याचे संकेत दिले गेले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number