मुंबई: 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या कांतारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. यासह, रिषभ शेट्टीने अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट काम केलंय. यासह, इतर कलाकारांनी 'कांतारा' चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली. चित्रपटात दाखवलेल्या पंजुर्ली देवी आणि गुलीगा देवाची कथा उत्तमपणे मांडण्यात आले. कर्नाटक राज्यातील संस्कृतीला चित्रपटात उत्तमपणे मांडल्यामुळे, तसेच, 'कांतारा' चित्रपटात सीजीआय आणि वीएफएक्सचा उत्तम वापर असल्याने हा चित्रपट अनेकांना आवडला.
हेही वाचा: ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ नंतर ‘रणपति शिवराय- स्वारी आग्रा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
कांतारा चित्रपटाचा चॅप्टर 1 लवकरच प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा झाल्यावर अनेकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. 2 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच तब्बल 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. भारतासह जगभरात कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने जगभरातून किती कोटींची कमाई केली असेल? चला तर जाणून घेऊया .
मिळालेल्या माहितीनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच, जागतिक स्तरावर 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूणच 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 100 कोटींच्या वर पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे.