उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय? या संदर्भातील एक्झिट पोल जाहीर झाला आहे.
पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील मतदान पार पडले आहे. या पाच राज्यातील मतदार काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टी यापैकी कोणत्या पक्षाला कौल देणार याचा कल एक्झिट पोलमधून सादर झाला आहे. पाच राज्यातील सत्ता कोणत्या पक्षांकडे जाणार याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येणार आहे.
५ राज्यांत मतदान पार पडले.
पाच राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश.
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागा.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ७ टप्पे.
१० फेब्रुवारी , १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च.
सोमवारी ७ मार्चला सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण.
गोवा आणि उत्तराखंड राज्यातील मतदान १४ फेब्रुवारी रोजी पूर्ण.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारीला मतदान.
मणिपूर राज्यात २७ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी मतदान.
५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल १० मार्चला.