पाच राज्यांचा आज लागणार फैसला!

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब विधानसभेचा गुरुवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. या निकालामुळे राजकीय पक्षांचे भविष्यही ठरणार आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे या राज्यात कोणाची सत्ता येणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप? उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची कलचाचणी […]

पाच राज्यांचा आज लागणार फैसला!

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब विधानसभेचा गुरुवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. या निकालामुळे राजकीय पक्षांचे भविष्यही ठरणार आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे या राज्यात कोणाची सत्ता येणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची कलचाचणी समोर आली आहे. या कलचाचणीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुतेक कल चाचण्यांमध्ये भाजपा वरचढ असल्याचा अंदाज समोर आला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची दयनीय स्थिती असल्याचे कलचाचणीनुसार समोर आले आहे.

गोव्यात त्रिशंकू मतदान?

गोव्याच्या कलचाचणीनुसार, गोव्यात त्रिशंकू विधानसभा होण्याचा अंदाज  वर्तवण्यात येत आहे. गोव्यात भाजपा आणि काँग्रेस सत्तास्थापनेसाठी चुरस रंगणार आहे. आम आदमी पार्टी गोव्यात खाते उघडणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number