नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासूनमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाचा कहर पहिला मिळत आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. जिल्ह्यात असलेल्या काही प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर, दारणा,पालखेड या प्रमुख धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने गोदावरी,दारणा आणि कादवा या नद्यांची […]

नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासूनमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाचा कहर पहिला मिळत आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. जिल्ह्यात असलेल्या काही प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर, दारणा,पालखेड या प्रमुख धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने गोदावरी,दारणा आणि कादवा या नद्यांची पाणी पातळी देखील वाढली आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे नदी- नाल्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत.अशातच मुसळाधार पावसाची शक्यता वर्तवली जात असताना हवामान खात्याने पुढच चार दिवस नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केला आहे.धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्याने नद्यांना मोठा पूर आला आहे. सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे .

नदी नाल्याना पूर आला आहे. तर अनेक भागात पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भाग असलेला त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कायम असून आता पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.यामुळे जिल्ह्यातील धारण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून १० हजार क्युसेकने विसर्गही करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात पुढीचे काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सध्या मुसळधार नंतर संततधार सुरु आहे. या पावसाचा परिणाम पुराच्या स्वरूपात दिसून येत आहे. पावसाचे रौद्र रूप देखील दिसत आहे. तर दुसरी कडे नाशिक त्रंबकेश्वर मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ सुरु झाली आणि भरपूर प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रविवार पासून त्रबकेश्वरमध्ये सुरू आहे मुसळधार पाऊस पडत आहे. त्रंबकेश्वरमधील रस्त्यानं देखील नदीचे स्वरूप आले आहे तर काही मंदिरे पाण्या खाली गेल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number