रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पुढचे ५ दिवस हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे . मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे, पुढचे ५ दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. मंगळवार संध्याकाळपासून सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी झाला होता. चिपळूणमध्ये मात्र पावसाचा जोर वाढत आहे. वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर वाहत आहे.अतिमुसळधार पाऊसामुळे राज्यात ठीक ठिकाणी पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असल्याचं घरा बाहेर पडावे असे
मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सायंकाळपासून अति मुसळधार पाऊसला सुरुवात झाली होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह कोकणातही मंगळवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. राजापूर, खेड, चिपळूण या भागांतही जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. 🌧🌧
📢 कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे.
🌊🌊कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी… https://t.co/kxlIAKcXa7 — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022