भाजपाचा नागपुरात पराभव झाला असून अमरावतीत कुंथत कुंथत वाटचाल सुरु आहे. भाजपाला अतिआत्मविश्वास नडला आहे.
नागपुरात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार पराभूत झाले त्याचबरोबर दुसरीकडे अमरावतीत रणजित पाटील हे सध्या पिछाडीवर आहेत.
भाजपा समर्थकांची अनेक बाद मते बाद झाली.
सत्तेत असल्याने निवडणूक जिंकण्याचा अतिआत्मविश्वास नडला.
कार्यकर्ते आणि नेत्यांमधील संवाद खुंटला.
उमेदवार गाफील राहिले.
नवे चेहरे देण्याची गरज होती.
मागील दोन टर्म नागो गाणार हे आमदार होते त्यामुळे तेच हॅटट्रिक करतील असा अतिआत्मविश्वास भाजपात होता. पण, नागपुरात नागो गाणार यांना पराभूत करत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झालेला आहे. अमरावतीतही रणजित पाटील यांना मागे टाकत धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत.