Dussehra 2025: रावण दहनाची राख जपून ठेवा; ‘या’ सोप्या पण प्रभावी उपायांमुळे घरात येईल सकारात्मक ऊर्जा, लाभेल संपत्ती आणि कुटुंबात वाढेल आनंद

आज देशभरात दसरा उत्साहात साजरा केला जात आहे.

Dussehra 2025: रावण दहनाची राख जपून ठेवा; ‘या’ सोप्या पण प्रभावी उपायांमुळे घरात येईल सकारात्मक ऊर्जा, लाभेल संपत्ती आणि कुटुंबात वाढेल आनंद

Dussehra 2025: आज देशभरात दसरा उत्साहात साजरा केला जात आहे. विजयादशमीच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे प्रतीक म्हणून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. या दिवशी घरात नवीन कामे सुरू करणे, शुभकार्य करणे आणि पूजा अर्चा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की रावण दहनानंतर उरलेली राख आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी ठरते?

रावण दहनानंतर उरलेली राख घरात सकारात्मक ऊर्जा आणते, नकारात्मक शक्तींना दूर करते आणि आयुष्यातील अडचणी सोप्या पद्धतीने दूर करण्यास मदत करते, अशी मान्यता आहे. या राखेचे काही खास उपाय करून आर्थिक तंगी, आरोग्याचे प्रश्न आणि कुटुंबातील वाईट ऊर्जा कमी करता येते.

हेही वाचा: Akola: दसऱ्यादिवशी 'या' गावात होते रावणाची पूजा, 350 वर्षे जुनी प्रथा

रावण दहनानंतर राखेचा उपाय
दसऱ्याच्या दिवशी उरलेली राख स्वच्छ लाल कपड्यात बांधून घरी आणणे शुभ मानले जाते. हा लाल कपडा मुख्य दरवाजावर किंवा घराच्या पूजाघरात ठेवला तर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अशा प्रकारे राख घरात टांगल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि सुख, सौभाग्य वाढते.

राखेची एक छोटी पोटली बनवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे फार महत्त्वाचे आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी ही राख राम मंदिरात नेऊन प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करणे फायदेशीर मानले जाते. घरात येणारी सुखशांती, सौभाग्य आणि आर्थिक स्थैर्य यासाठी हा उपाय विशेष उपयुक्त ठरतो.

जर कुटुंबातील कोणावर वाईट नजर किंवा बाधा असल्यास, राख हनुमान मंदिरात नेऊन हनुमानचालीसा म्हणत प्रार्थना करणे अत्यंत लाभदायक ठरते. त्यानंतर राख पुन्हा घरी आणून ज्या व्यक्तीला बाधा आहे त्या व्यक्तीच्या कपाळावर थोडी राख लावल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात, अशी मान्यता आहे.

आर्थिक तंगी असलेल्या लोकांसाठी ही राख तिजोरीत किंवा व्यवसायात पैसे ठेवण्यासाठी जपून ठेवण्याचे उपाय आहेत. राख एका लाल कपड्यात, त्यात एक रुपयाचे नाणे व विलायची टाकून बांधली की लक्ष्मीमातेची कृपा सदैव राहते. अशा प्रकारे राखेचा योग्य वापर केल्यास घरात धनसंपत्ती, आनंद आणि समृद्धी वाढते.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर राख जपणे आणि योग्य उपाय करणे केवळ धार्मिक पारंपरिक प्रथा नसून, आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणणारा मार्ग मानला जातो. या साध्या पण प्रभावी उपायांमुळे घरात नकारात्मक शक्ती कमी होतात, कामकाज सुरळीत होते आणि घरातील सदस्यांमध्ये सौख्य वाढते.

अशा प्रकारे, दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर उरलेली राख फक्त प्रतीकात्मक राहणार नाही, तर ती आपल्यासाठी संपत्ती, सुख आणि सकारात्मक उर्जा आणणारा साधन बनते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number