Shani Jayanti 2026: 13 वर्षांनी जुळून आला दुर्मिळ योग! शनिदेवाची विशेष कृपा मिळवण्याची सुवर्णसंधी; करा ‘हे’ उपाय

16 मे 2026 रोजी शनि जयंती आणि वैशाख अमावस्या एकाच दिवशी आल्याने दुर्मिळ महायोग जुळून आला आहे.

Shani Jayanti 2026: 13 वर्षांनी जुळून आला दुर्मिळ योग! शनिदेवाची विशेष कृपा मिळवण्याची सुवर्णसंधी;  करा ‘हे’ उपाय

यंदाचा 16 मे 2026 हा दिवस धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तब्बल 13 वर्षांनंतर वैशाख अमावस्या आणि भगवान शनिदेवांची जयंती एकाच दिवशी येत असल्याने हा दुर्मिळ योग अत्यंत प्रभावशाली मानला जात आहे. विशेष म्हणजे यंदा अमावस्या शनिवारी आल्याने तिला ‘शनि अमावस्या’ किंवा ‘शनैश्चरी अमावस्या’ असेही म्हटले जाते. त्यामुळे देशभरातील शनिमंदिरांमध्ये विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

शनि जयंती आणि अमावस्येचा दुर्मिळ योग का खास?

धार्मिक मान्यतेनुसार, वैशाख अमावस्येलाच सूर्यपुत्र भगवान शनिदेवांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जयंती आणि अमावस्या एकाच दिवशी येणे हे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेली पूजा, मंत्रजप आणि दानधर्म अनेक पटींनी फलदायी ठरतात, असे मानले जाते.

हेही वाचा: May 2026 Pornima Shubh Yog : मे महिन्यात दुर्मीळ 'दुहेरी पौर्णिमा' योग; जाणून घ्या, 'फ्लॉवर मून' आणि 'ब्लू मून'चे ज्योतिष आणि खगोलशास्त्रीय महत्त्व

साडेसाती आणि ढय्येचा त्रास असणाऱ्यांसाठी विशेष दिवस

ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती, ढय्या किंवा शनीदोष सुरू आहे, त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. जीवनात सतत अडथळे, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा कामांमध्ये अपयश येत असेल तर शनिदेवाची भक्तिभावाने पूजा केल्याने सकारात्मक बदल होऊ शकतात, अशी श्रद्धा अनेकांची आहे.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळल्यास ते अधिक शुभ मानले जाते. त्यानंतर शनि मंदिरात जाऊन भगवान शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. पूजा करताना शनिदेवाच्या डोळ्यांत न पाहता त्यांच्या चरणांकडे पाहून प्रार्थना करण्याची परंपरा आहे.

संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर झाडाला सात प्रदक्षिणा घालत ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे शनीची कृपा लाभते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते.

दानधर्माचे विशेष महत्त्व

शनि अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. काळे तीळ, काळे उडीद, खिचडी किंवा अन्नदान गरजू लोकांना करावे. तसेच काळे कपडे, लोखंडी वस्तू, काळी छत्री किंवा चामड्याचे बूट दान केल्यास शनीदोष कमी होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. काही जण काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकरी खाऊ घालतात. यामुळेही शनिदेव प्रसन्न होतात, असे सांगितले जाते.

हेही वाचा: Shani Jayanti 2026 : शनी जयंतीला ग्रहांचा अद्भुत संगम; या 4 राशींसाठी उघडणार नशिबाचे दरवाजे; धनलाभ, पदोन्नती आणि व्यावसायिक यश मिळेल

या दिवशी काय टाळावे?

धार्मिक मान्यतेनुसार, शनि अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी टाळणे शुभ मानले जाते. या दिवशी मीठ, लोखंड आणि मोहरीचे तेल खरेदी करू नये. तसेच कोणाशीही खोटे बोलणे, गरीबांचा अपमान करणे किंवा अन्यायकारक वर्तन करणे टाळावे.

भक्तांसाठी विशेष पर्व

यंदाची शनि जयंती आणि शनि अमावस्या अनेक भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा मोठा पर्व ठरणार आहे. विशेष पूजा, मंत्रजप आणि दानधर्माद्वारे शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number