11 जानेवारीपासून सुरु झालेला बिग बॉस सीझन 6 आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रँड फिनाले 19 एप्रिलला पार पडणार आहे. अशातच 11 एप्रिलला झालेल्या भाऊच्या धक्क्यावरून बिग बॉसच्या घरातील एक महत्त्वाचा सदस्य बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या घरात आल्या दिवसापासून जिने आपल्या एंटरटेनमेंटने घरात धुमाकुळ घालून प्रेक्षकांची मनं जिंकली अशा राखी सावंतचा बिग बॉस मराठी सीझन 6 मधला प्रवास संपला आहे. काल म्हणजेच 11 एप्रिलला यंदाच्या सीझनचा शेवटचा भाऊचा धक्का पार पडला. यावेळी बिग बॉसची टीआरपी क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत घरातून बाहेर पडली. फिनालेच्या अगदी जवळ येऊन राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’चा प्रवास संपला आहे.
हेही वाचा- Bigg Boss Marathi 6 : एकटी तन्वी नव्हे तर आणखी एका सदस्याचं नशीब चमकल; ‘हा’ स्पर्धक ठरणार ‘टिकिट टू फिनाले’चा दुसरा मानकरी?
अनेक सीझन बीग बॉसच्या घरात आली तरी एकही ट्रॉफी जिंकली नाही?
राखी सावंत आतापर्यंत तब्बल बिग बॉसच्या 18 सीझनमध्ये झळकली आहे. ज्यात 14 हिंदी बिग बॉस आणि 4 मराठी बिग बॉस असा तिचा प्रवास आहे. संपूर्ण घराला आपल्या तालावर नाचवणारी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी राखी सावंत इतके वेळा बिग बॉसच्या घरात येऊन देखील अजून एकदाही तिने ट्रॉफी जिंकली नाही, त्यामुळे राखी सावंत बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात चर्चित स्पर्धकांपैकी एक मानली जाते. दरम्यान बिग बॉसच्या अनेक सीझनमध्ये येऊन देखील ट्रॉफी न जिंकण्यामागचं रहस्य राखीने स्वत: सांगितलं आहे.
2022 मध्ये तिने एका मुलाखतीत म्हटलं होत की, “बिग बॉस जसं सलमान खानशिवाय अपूर्ण आहे, तसंच ते माझ्याशिवायही व्यर्थहीन आहे. जर मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मला पुन्हा या शोमध्ये येता येणार नाही. मला प्रत्येक सीझनमध्ये धम्माल करण्यासाठी बोलावलं जातं.” शिवाय सध्या सुरु असलेला बिग बॉस मराठी सीझन 6 च्या एका एपिसोडमध्ये प्रभूने तिला हाच प्रश्न विचारला होता. ज्यात तो तिला म्हणाला की, “एवढे सीझन करूनही ट्रॉफी का नाही मिळाली?” यावर राखी त्याला म्हणाली की, “मी जर ट्रॉफी जिंकली तर मला पुन्हा बिग बॉसमध्ये येता येणार नाही. बिग बॉस माझं प्रेम आहे.” तसेच तिने बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर पडताना देखील हे स्पष्ट केलं की, बिग बॉस तिच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत ती बिग बॉसमध्ये येत राहणार.
हेही वाचा- Asha Bhosale Health Update : आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! “आशा आहे की सर्व काही ठीक होईल” जवळच्या व्यकीने दिली ‘ही’ माहिती
राखीचा बिग बॉसमधील आतापर्यंतचा प्रवास
असं म्हटलं जात की, ज्या सीझनमध्ये TRP कमी असतो त्या वेळी राखीला बोलावलं जातं. बिग बॉसमधील राखी सावंत एक अशी सदस्य आहे जिच्या येण्यानेच शोला वेगळी रंगत येते. तिचा ड्रामा, इमोशन्स आणि कॉमेडी यामुळे प्रेक्षक बिग बॉस बघतात. राखी 2006 साली बिग बॉसच्या पहिल्या सीझन मध्ये दिसली होती. त्यावेळेसच ती प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर बिग बॉस 14 मध्ये ती चॅलेंजर म्हणून आली आणि थेट फायनलपर्यंत पोहोचली. बिग बॉस 15 मध्येही तिचा सहभाग गाजला. त्यानंतर राखी मराठी बिग बॉसकडे वळली. बिग बॉस मराठी 4 मध्ये ती वाइल्ड कार्ड होती आणि फिनालेपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर बिग बॉस मराठी 6 मध्येही ती वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत शेवटच्या आठवड्यात पोहचली. ड्रामा क्विन राखी सावंत ही बिग बॉसची ओळख असल्याच म्हटलं जात. पुढच्या कितीही सीझनमध्ये ती आली तरी तिला पाहताना प्रेक्षक कंटाळणार नाहीत.