Rajinikanth Birthday : …तर आज रजनीकांत आपल्यात नसते! ‘त्या’ एका कारणामुळे रजनीकांत घेणार होते टोकाचा निर्णय

स्टार रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 साली झाला असून रजनीकांत यांनी नकारात्मक भूमिकांपासून सुरू केलेली कारकीर्द पुढे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या नावांपैकी एक बनली.

Rajinikanth Birthday : …तर आज रजनीकांत आपल्यात नसते! ‘त्या’ एका कारणामुळे रजनीकांत घेणार होते टोकाचा निर्णय

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात दिग्गज आणि स्टार अभिनेता रजनीकांत यांच्यासाठी आजचा दिवस जितका खास आहे तितकाच तो त्यांच्या चाहत्यांसाठी देखील खास आहे. थलाईवा म्हणून ओळखले जाणारा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 साली कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड असून 75 वर्षांच्या प्रवासात त्यांनी दक्षिण आणि हिंदी चित्रपटांत 20 हून अधिक भूमिका साकारत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अमाप लोकप्रियता आणि प्रतिष्ठा कमावली आहे.

हेही वाचा- Dhurandhar Banned : 'धुरंधर'ला धक्का; सहा देशांत बंदी, कारण ऐकून होईल संताप

रजनीकांत यांनी नकारात्मक भूमिकांपासून सुरू केलेली कारकीर्द पुढे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या नावांपैकी एक बनली. मात्र एवढा स्टार्डम मिळवलेल्या सेलिब्रेटीच्या मनात कधी काळी आत्महत्येचा विचार देखील आला होता. याबद्दल त्यांनी स्वत: एका मुलाखतीत कबूली दिली होती. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रजनीकांत यांनी अनेक छोटी मोठी काम केली आहेत. रजनीकांत यांनी गरिबी जवळून पाहिली. ज्यामुळे त्यांना पोर्टर, बस कंडक्टर आणि सुतार ही देखील काम करावी लागली आहेत. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या रजनीकांत यांना त्यांच्या गरिबीमुळे कठोर पाऊल उचलण्याचा विचार आला होता.

हेही वाचा- Sachet–Parampara expose Amaal Mallik : 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अमाल मलिकवर गंभीर आरोप; संचेत-परंपरानं थेट व्हिडिओ शेअर करत केला 'त्या' गाण्याबाबत खुलासा

दरम्यान रजनीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितले लहोते की, "गरीब कुटुंबांत जन्माला आल्यामुळे मला कधी ऑफिस बॉय म्हणून तर कधी पोर्टर म्हणून काम करायला लागायचे. त्यानंतर मी सुतार म्हणून काम करू लागलो. गरिबी म्हणजे काय हे मला चांगलेच माहिती आहे. यालाच कंटाळून मी जीव देण्याचा विचार केला होता." मात्र त्यांच्या मेहनतिने आणि कष्टाने त्यांच्या या विचारावर आणि गरिबीच्या भीतीवर मात केली, आणि आज ते आपल्यात एक सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. दरम्यान रजनीकांत यांनी 350 कोटींच्या "कुली" चित्रपटात तब्बल 520 कोटींची कमाई केली. त्यानंतर आता ते आगामी चित्रपट "जेलर 2" मध्ये दिसणार आहेत.  हा चित्रपट जून 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number