Rahul Navin: केंद्राचा मोठा निर्णय! राहुल नवीन यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ वर्षभराने वाढला

हा कार्यकाळ 13 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण होत आहे. त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या सेवेला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Rahul Navin: केंद्राचा मोठा निर्णय! राहुल नवीन यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ वर्षभराने वाढला

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) नेतृत्वाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईडीचे संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ईडीची धुरा सांभाळणारे राहुल नवीन आता 13 ऑगस्ट 2027 पर्यंत या पदावर कायम राहणार आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे ईडीच्या नेतृत्वात तातडीने बदल होण्याची शक्यता टळली आहे. राहुल नवीन यांची ईडीच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती 14 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आली होती. त्यांना सुरुवातीला दोन वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता. हा कार्यकाळ 13 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण होत आहे. त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या सेवेला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

सेवानिवृत्तीनंतरही काही दिवस जबाबदारी

या मुदतवाढीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल नवीन यांची नियोजित सेवानिवृत्ती 31 जुलै 2027 रोजी होणार आहे. मात्र, केंद्राच्या आदेशानुसार त्यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ 13 ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच सेवानिवृत्तीची तारीख उलटल्यानंतरही ते जवळपास दोन आठवडे ईडी प्रमुख म्हणून काम पाहतील. सरकारी आदेशात ही मुदतवाढ 13 ऑगस्ट 2027 पर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीची मंजुरी

राहुल नवीन यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्याच्या निर्णयाला कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला. 1993 बॅचचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेले राहुल नवीन सप्टेंबर 2023 पासून ईडीचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहत होते. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये त्यांची पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सप्टेंबर 2023 पासून ईडीची धुरा

राहुल नवीन यांनी 15 सप्टेंबर 2023 पासून ईडीचे प्रभारी संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी ते ईडीमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत होते. जवळपास वर्षभर प्रभारी संचालक म्हणून काम केल्यानंतर केंद्राने 14 ऑगस्ट 2024 रोजी त्यांची पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती केली. आता त्यांच्या दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळाची मुदत संपण्याच्या काही दिवस आधीच आणखी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षभर ईडीचे नेतृत्व राहुल नवीन यांच्याकडेच राहणार आहे.

ईडीच्या महत्त्वाच्या तपासांवरही लक्ष

राहुल नवीन यांच्या नेतृत्वाखाली ईडीने अनेक चर्चेतील आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांचा तपास पुढे नेला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील सातत्यामुळे सुरू असलेल्या महत्त्वाच्या तपासांवरही त्यांचा प्रभाव कायम राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number