नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. कोरोनामुळे सोनिया गांधी ईडी समोर हजर राहु शकणार नाही. राहुल गांधींच्या घराबाहेर आणि काँग्रेस मुख्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिल्ली ईडी कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद  करण्यात आले आहे. नवी दिल्लीत शक्तीप्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा […]

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. कोरोनामुळे सोनिया गांधी ईडी समोर हजर राहु शकणार नाही. राहुल गांधींच्या घराबाहेर आणि काँग्रेस मुख्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिल्ली ईडी कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद  करण्यात आले आहे. नवी दिल्लीत शक्तीप्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा ईडीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. कोरोनामुळे सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहू शकणार नाही.  राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखलही झाले आहेत. त्यांची किती काळ चौकशी होते याबाबत उत्सुकता आहे.

राहुल गांधी हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यादेखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे एकाच गाडीतून इडी कार्यालय आवारात दाखल झाले. राहुल गांधी इडी कार्यालयात गेले. प्रियंका गांधी बाहेर थांबल्या. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्तेही ईडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. त्यांना ईडी कार्यालयापासून साधारण एक किलोमीटर दूर अंतरावर बॅरिकेट्स लावून पोलिसांनी अडवले आहे. राहुल गांधी हे पायीचईडी कार्यालयात दाखल झाले.

काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण?

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हे स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्र आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९३८मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी या वृत्तपत्राचे प्रकाशन करत होती. १९३७मध्ये नेहरू व ५ हजार स्वातंत्र्य सैनिक या कंपनीत शेअरहोल्डर्स होते. तसंच, या कंपीनकडून अजून दोन दैनिक वृत्तपत्राचे प्रकाशन करत होते. उर्दूमधून कौमी आवाज आणि हिंदीतून नवजीवन. ही कंपनी कोणा एका व्यक्तीची मालकी नव्हती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number