सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. मात्र, नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेर अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळाली.
नितेश राणे न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता ते उच्च न्यायालयात अर्ज सादर करणार आहेत. तसेच नितेश राणे यांना पुढील १० दिवस पोलीस कोठडी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असल्याची माहिती सरकारी वकिलाने दिली आहे.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, उच्च न्यायालयानेसुद्धा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालायत धाव घेतली असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.