R Madhvan on Political entry: थलापती विजय यांच्यापाठोपाठ आर माधवनही राजकारणात उतरण्याच्या तयारीत? अभिनेता स्वत: म्हणाला…

चित्रपटाच्या प्रचारादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने तामिळनाडूच्या राजकारणावर भाष्य करत मुख्यमंत्री थलपती विजय यांचं कौतुक केलं.

R Madhvan on Political entry: थलापती विजय यांच्यापाठोपाठ आर माधवनही राजकारणात उतरण्याच्या तयारीत? अभिनेता स्वत: म्हणाला…

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या आगामी 'जीडीएन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रचारादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने तामिळनाडूच्या राजकारणावर भाष्य करत मुख्यमंत्री थलपती विजय यांचं कौतुक केलं. मात्र, स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत त्याने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं सांगितलं.

एका मुलाखतीत बोलताना माधवनने थलपती विजय यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. विजय यांच्याशी अनेक वर्षांची ओळख असल्याचं सांगताना तो म्हणाला की, त्यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास पाहून अनेक गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगाने बदलू शकतात, याची जाणीव झाली. यावेळी त्याने हलक्याफुलक्या अंदाजात, "आता त्यांना फक्त विजय म्हणणं योग्य नाही, तर 'मुख्यमंत्री विजय' असंच संबोधायला हवं," अशी प्रतिक्रिया दिली.

राजकारणात येण्याबाबत दिलं स्पष्ट उत्तर

माधवनला भविष्यात राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्याने कोणतीही संदिग्धता न ठेवता उत्तर दिलं. त्याच्या मते, राजकारणात यायचं असेल तर समाजासाठी काम करण्याची प्रामाणिक तळमळ आणि त्यागाची तयारी असावी लागते. स्वतःमध्ये ती भावना नसल्यामुळे राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. राजकारणाशिवायही समाजासाठी चांगलं काम करता येतं, असं मत माधवनने व्यक्त केलं. राजकारण हे अत्यंत गुंतागुंतीचं क्षेत्र असल्याचं सांगत, त्या विषयाचं सखोल ज्ञान नसल्यामुळे त्यापासून दूर राहणंच योग्य वाटत असल्याचं त्याने नमूद केलं.

'जीडीएन' 7 ऑगस्टला प्रदर्शित

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, कृष्णकुमार रामकुमार दिग्दर्शित 'जीडीएन' हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तामिळसह हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2'मधील भूमिकांमुळेही आर. माधवन चर्चेत आला होता.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number