Putin India Visit: भारत-अमेरिकेत तणाव, पुतिन भारतात, पंतप्रधान मोदी यांनी दिली खास भेटवस्तू

व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौर्‍याची सुरुवात मोदींनी विमानतळावर विशेष स्वागत करून केली. संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करारांच्या चर्चांना वेग आला आहे.

Putin India Visit: भारत-अमेरिकेत तणाव, पुतिन भारतात, पंतप्रधान मोदी यांनी दिली खास भेटवस्तू

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आगमन झाल्यानंतर राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. काल रात्री पुतिन भारतात पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. विशेष परंपरेनुसार आयोजित स्वागत सोहळ्यात दोन्ही नेत्यांनी आदरपूर्वक हस्तांदोलन करत भेटीची सुरुवात केली. पुतिन यांच्या या दौऱ्यासाठी भारत सरकारने अत्यंत काटेकोर नियोजन केले असून सुरक्षा ते राजनैतिक कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक बाबीवर बारीक लक्ष देण्यात आले आहे. पुतिन यांच्यासोबत रशियाचे सात वरिष्ठ मंत्रीही भारतात आले आहेत, यामुळे या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे.

रात्री उशिरा नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी अनौपचारिक डिनरदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. संरक्षण, ऊर्जा, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काही नवे करार या दौऱ्यात अंतिम होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पुतिन यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका भारतावर रशियन कच्चे तेल खरेदी कमी करण्याचा दबाव टाकत असताना पुतिन यांचा भारत दौरा विशेष महत्त्वाचा ठरतो. युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पुतिन प्रथमच भारतात आले असून जवळपास चार वर्षांनी हा दौरा होत आहे.

हेही वाचा: Air Defense System: S-500 खरेदीकडे भारताचा वाढता कल; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दीर्घ-पल्ल्याच्या हवाई सुरक्षेवर भर

भारत आणि अमेरिकेमधील संबंध सध्या तणावपूर्ण अवस्थेत असल्याने ही भेट अधिक राजकीय वजन घेऊन आली आहे. अमेरिकेच्या कठोर टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सुमारे 70 टक्के निर्यातीवर परिणाम झाला आहे आणि व्यापारावर मोठा प्रतिकूल प्रभाव पडला आहे. पुतिन यांचा यापूर्वीचा भारत दौरा 2021 मध्ये झाला होता. त्यानंतर 2024 मध्ये पंतप्रधान मोदी मॉस्कोला भेट देऊन पुतिन यांच्यासोबत दीर्घ चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर सध्याचा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

विमानतळावर आगमनाच्या क्षणी मोदी यांनी प्रोटोकॉलच्या बाहेर जावून पुतिन यांचे स्वागत केले, यामुळे दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक जवळीकही स्पष्टपणे दिसून आली. पुतिन यांच्या स्वागतासाठी मोदींनी त्यांना एक खास भेटही दिली. रशियन भाषेत मुद्रित केलेली भगवतगीता त्यांनी पुतिन यांना भेट म्हणून दिली. पुतिन यांनीही ही भेट प्रेमाने स्वीकारली आणि दोन्ही नेत्यांनी थोडा वेळ अनौपचारिक संवाद साधला.

विमानतळावर भेटताच पुतिन आणि मोदी यांनी एकमेकांना मिठी मारली, ज्यामुळे या दौऱ्याची सकारात्मक सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. अलीकडच्या चीन भेटीदरम्यानही या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती आणि त्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला होता. त्यामुळे पुतिन यांचा भारत दौरा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून दोन देशांतील विश्वास, सहकार्य आणि दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक ठरत आहे.

हेही वाचा: Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा धक्का; पुतीन दौऱ्यावर असतानाच घेतला मोठा निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number