पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू

पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांना दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक पाहता, राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १९ जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात न आल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती […]

पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू

पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांना दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक पाहता, राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १९ जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात न आल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती पुण्यातील कोरोना आढावा बैठक पार पडली असून १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

शाळा सुरू करण्याबाबत पुण्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, पहिली ते आठवीचे वर्ग चार तास असणार आहेत. तर नववीच्या पुढचे वर्ग पुर्ण वेळ असणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, हा अंतिम निर्णय पालकांचा असणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. संबंधित नियमावली पहिली ते आठवी वर्गासाठी एका आठवड्यासाठी असणार असून १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयेसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.

काय आहेत नवे नियम?

५० टक्के क्षमतेने शाळा सुरू होणार आहेत.

आठवी पर्यंतचे वर्ग चार तास भरणार आहे.

नववीच्या पुढचे वर्ग पूर्ण वेळ असणार आहेत.

विद्यार्थांना शाळेत पाठवायचे की नाही, हा अंतिम निर्णय पालकांचा असेल.

विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल.

रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाईज करण्यात येतील.

विद्यार्थ्यांना शाळेतच लस मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number