पुणे पोलिसांनी केली १८०० गुंडांची झाडाझडती

मुंबई, ५ जुलै २०२३, प्रतिनिधी : पुण्यात गेल्या काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस अॅक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी मंगळवारी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीमे अंतर्गत एकाच दिवसांत तब्बल १ हजार ८८२ गुन्हेगारांची धरपकड करत १५८ जणांना अटक केली. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात […]

पुणे पोलिसांनी केली १८०० गुंडांची झाडाझडती

मुंबई, ५ जुलै २०२३, प्रतिनिधी : पुण्यात गेल्या काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस अॅक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी मंगळवारी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीमे अंतर्गत एकाच दिवसांत तब्बल १ हजार ८८२ गुन्हेगारांची धरपकड करत १५८ जणांना अटक केली.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. कोयता गॅंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुण्याची सांस्कृतिक पुणे ही ओळख पुसून गुन्हेगारांचे पुणे अशी होऊ लागली होती. दरम्यान, पुण्यातील तळजाई वसाहत, वारजे भागात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्यात आल्याच्या घटना घडल्या. सदाशिव पेठेत भररस्त्यात तरुणीवर वार करण्यात आले. यामुळे पोलिस आता अॅक्शन मोड मध्ये आले आहे.

या अंतर्गत शनिवारी ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार एकाच दिवसांत १ हजार ८८२ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. यातील ६३९ गुन्हेगार मूळ पत्यावर राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणे, जुगार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करुन १५९ जणांना अटक केली.पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले. सोमवारी मध्यरात्रीनंतर शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांनी ही मोहीम राबविली. गुन्हे शाखा, तसेच विविध पाेलीस ठाण्यातील पथके या मोहिमेत सहभागी झाले होते.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, काेयते, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष मोहिमेत पोलिसांनी मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडले आहे. मारहाणीच्या गु्न्ह्यात सात जणांना अटक करण्यात आली. बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले. शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी १३ गुंडांना अटक करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number