शरद पवार यांच्या संपत्तीत 6 वर्षांत 60 लाखांनी वाढ

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, राज्यसभा खासदार शरद पवार यांची संपत्ती सहा वर्षात 60 लाखांनी वाढली आहे. शपथपत्रात शरद पवार यांनी आपली 32.73 करोड रुपयांची एकूण मिळकत जाहीर केली आहे. यामध्ये 25,21,33,329 रुपयांची जंगम आणि 2,52,33,941 रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. 2014 च्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात पवारांनी 20,47,99,970.41 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 11,65,16,290 […]

शरद पवार यांच्या संपत्तीत 6 वर्षांत 60 लाखांनी वाढ

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, राज्यसभा खासदार शरद पवार यांची संपत्ती सहा वर्षात 60 लाखांनी वाढली आहे. शपथपत्रात शरद पवार यांनी आपली 32.73 करोड रुपयांची एकूण मिळकत जाहीर केली आहे. यामध्ये 25,21,33,329 रुपयांची जंगम आणि 2,52,33,941 रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

2014 च्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात पवारांनी 20,47,99,970.41 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 11,65,16,290 रुपयांची स्थावर मालमत्ता अशी मिळून 32.13 कोटींची संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं.

शरद पवार यांची संपत्ती

आपल्यावर 1 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचंही शपथपत्रात पवार यांनी म्हटलं आहे. प्रतिभा पवार यांच्याकडून ‘Advance Deposit’ म्हणून 50 लाख रुपये मिळाले असल्याचं शपथपत्रात म्हटलं आहे. तसंच हिंदू अविभाज्य कुटुंब कायद्यानुसार शरद पवार यांना Advance Deposit म्हणून अजित पवार यांचा मुलगा आणि शरद पवार यांचा नातू पार्थ पवार याच्याकडून 50 लाख रुपये मिळाल्याचंही शपथपत्रात म्हटलंय. तसंच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी पैसे मिळाल्याचंही म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number