पंतप्रधान नरेंद्र मोदी २ मेपासून विदेश दौऱ्यावर आहेत. या विदेश दौऱ्यात पंतप्रधान तीन युरोपीय देशांचा दौरा करणार आहेत. ते जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसला भेट देणार आहेत. पंतप्रधान यांचा जर्मनी दौरा सोमवारपासून सुरु झाला. या दौऱ्यात ते जी- ७ परिषदेत सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत – जर्मनी दरम्यान संबंध वृद्धिंगत होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच कोरोनानंतर भारताची सर्वाधिक वेगाने प्रगती झाल्याचही त्यांनी या दरम्यान सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी – ७ परिषदेत भाषण केलं. भाषणात त्यांनी रशिया -युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. युद्धाच्या संघर्षामुळे सगळ्यांचे नुकसान होतेय असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या युद्धामुळे कच्चा तेलाचे भाव भडकलेत असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान २५ कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत. यादरम्यान ते सुमारे ६५ तास विदेशामध्ये असणार आहेत. सध्या ते जर्मनीत असून दौऱ्याचा समारोप हा पॅरिस येथे होणार आहे.
पंतप्रधान मोदींचे जर्मनीत ढोल ताशाच्या गजरात मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांच्या स्वागताला ढोल-लेझीम आणि शिवरायांच्या वेशात भारतीय जमले होते.