पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी कोचीमध्ये पायी रोड शो केला. यावेळी ते केरळच्या पारंपरिक पोशाखात दिसले. पीएम मोदी ‘युवम 2023’ या तरुणाईच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. मोदी 2 दिवसांत 8 शहरांमध्ये 7 कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.
यानंतर संध्याकाळी मोदी ख्रिश्चन समुदायाच्या ज्येष्ठ धर्मगुरूंची भेटही घेणार आहेत. ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना असेल. पक्षाच्या ‘स्नेह यात्रा’ या प्रचार अभियानांतर्गत ही बैठक होत आहे. यामध्ये केरळमधील भाजप नेत्यांनी इस्टर आणि ईदच्या निमित्ताने ख्रिश्चन, मुस्लिम नेते आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या घरी भेट दिली होती. भाजपच्या म्हणण्यानुसार, ख्रिश्चन समुदायातील अनेक सदस्यांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केल्यामुळे प्रचार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच या भागातील लोक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर पोहोचले. पंतप्रधान कोची येथील INS गरुड नौदल हवाई स्टेशनवर उतरले. कोचीमध्ये रोड शो दरम्यान पीएम मोदी पायी चालले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. लोकांनी पंतप्रधानांवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं. हे सर्व दृश्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनतेतील क्रेझ पाहायला मिळाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनाही पंतप्रधानांनी हात हलवून अभिवादन केले. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शहरात 2,060 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.