Prasika : Instagram ने मागितली ‘प्रसिका’ची माफी, प्रसाद-दीपिकाचं सस्पेंडेड अकाऊंट पुन्हा सुरू, फोटो शेअर करत दिली माहिती

मात्र आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

Prasika : Instagram ने मागितली ‘प्रसिका’ची माफी, प्रसाद-दीपिकाचं सस्पेंडेड अकाऊंट पुन्हा सुरू, फोटो शेअर करत दिली माहिती

मागील काही दिवसांआधी सोशल मीडियावरचं प्रसिद्ध कंटेट क्रिएटर कपल प्रसिकाचं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यामुळे सोशल मिडीयावर एकच चर्चा सुरू होती. कोणतीही आगाऊ माहिती न देता अकाऊंट सस्पेंड केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

दहा दिवसांतच त्यांना त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरू झालं आहे. प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांचं prasika_official हे इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर स्क्रिन शॉट शेअर करत ही माहिती दिली आहे. ही माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Kirit Somaiya : दोनदा खासदारकी हुकली, पण संघर्ष थांबला नाही; भाजपने किरीट सोमय्यांवर सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

अकाऊंड सस्पेंड झाल्यानंतर प्रसादने व्हिडीओ शेअर करत इन्स्टाग्राम आणि मेटाला त्यामागचं कारण विचारत अकाऊंट पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र मेटाकडून अनेक दिवस काहीच प्रतिसाद येत नव्हता. दोघांनी मेटाच्या बीकेसीतील ऑफिसला भेट दिली होती. मात्र त्यांना रिसेप्शनवरच थांबवण्यात आलं होतं. 

हेही वाचा – Rohit Pawar Vidhan Sabha : काकाचा शोकप्रस्ताव, पुतण्या सभागृहात ढसाढसा रडला, काकींना शब्द दिला… 

इन्स्टाग्रामकडून आलेल्या मेलच्या स्क्रिनशॉट दीपिकानं शेअर केला. ज्यात त्यांनी लिहिलंय, "तुम्ही अकाउंटच्या रिव्ह्यूसाठी विनंती केल्याबद्दल धन्यवाद. आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल आणि काही काळ तुम्हाला Instagram वापरता न आल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या कम्युनिटीला सुरक्षित ठेवण्यासाठी काही वेळा आम्हाला अशी कारवाई करावी लागते."

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number