Prajakta Mali – Lalit Prabhakar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकत्र; प्राजक्ता – ललितने व्हिडीओ शेअर करत केली नवी घोषणा

सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत प्राजक्ता आणि ललितने या प्रोजेक्टची घोषणा केली.

Prajakta Mali – Lalit Prabhakar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकत्र; प्राजक्ता – ललितने व्हिडीओ शेअर करत केली नवी घोषणा

Prajakta Mali and Lalit Prabhakar: मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रेक्षकांची लाडकी ऑनस्क्रीन जोडी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या तुफान गाजलेल्या मालिकेत आदित्य आणि मेघनाची भूमिका साकारून या जोडीने महाराष्ट्रातील घराघरांत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मालिकेनंतर तब्बल 13 वर्षांनी ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र येत असल्याने चाहत्यांचा उत्साह आणि उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल; जुन्या आठवणींना उजाळा
या जोडीच्या आगामी नव्या चित्रपटाचे नाव ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ असे आहे. सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत प्राजक्ता आणि ललितने या प्रोजेक्टची घोषणा केली. एका वृत्तानुसार, या व्हिडिओमधील दोघांची भेट आणि केमिस्ट्री ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारी आहे. ‘आणि आम्ही परत एकत्र आलो… गेली 13 वर्षे हा महाराष्ट्र आमच्यावर भरभरून प्रेम करतोय, ही रेशीमगाठ अजून घट्ट करायला ‘The OG Jodi is back” अशा शब्दांत प्राजक्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा – Maanjar Movie: कोकण कोहिनूर ओंकार भोजनेचं मोठ्या पडद्यावर दणदणीत कमबॅक! भाग्यश्री लिमये, सिद्धार्थ मेननसह तगडी स्टारकास्ट; ‘मांजर’चा भन्नाट टीझर रिलीज

साध्या लग्नाऐवजी यंदा थेट ‘डेस्टिनेशन वेडिंग
चित्रपटाच्या शीर्षकावरूनच ही कथा प्रेम, कौटुंबिक नातेसंबंध आणि लग्नाभोवती फिरणारी असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. मात्र, यावेळी साधेसुधे लग्न नसून प्रेक्षकांना थेट ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा धमाका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ग्लॅमरस लग्नसोहळा, जोडीमधील गोड संवाद आणि लग्नातील दंगल या सगळ्यातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा मोठा तडका अनुभवता येईल.

चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
हा बहुप्रतिक्षित चित्रपट 1 मे 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्राजक्ता आणि ललितच्या या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला आहे. 13 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या जोडीची जादू बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा हाऊसफुलचा बोर्ड लावेल, असा विश्वास चित्रपटप्रेमी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – Priya Berde : ‘स्वामींनीच वाचवलं…’; मुंबईला परतताना प्रिया बेर्डे यांच्या बसचा अपघात; अभिनेत्रीने सांगितली भयावह प्रसंगाची आपबीती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number