प्रज्ञा सातव यांची निवडणूक बिनविरोध

  विधान परिषदेत काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना बिनविरोध उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.   प्रज्ञा सातव यांना बिनवरोध उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच यासाठी भाजपने आपला उमेदवाऱ्याचा अर्ज मागे घेतला आहे. भाजप उमेदवार […]

प्रज्ञा सातव यांची निवडणूक बिनविरोध

  विधान परिषदेत काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना बिनविरोध उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

  प्रज्ञा सातव यांना बिनवरोध उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच यासाठी भाजपने आपला उमेदवाऱ्याचा अर्ज मागे घेतला आहे. भाजप उमेदवार संजय केणेकर यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे.

 प्रज्ञा सातव यांची विधान परिषद निवडणूक बिनविरोध असावी यासाठी काँग्रेसकडून अनेक प्रयत्न केले जात होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपने माघार घेऊन काँग्रेसची विनंती मान्य करत प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवडणूकीसाठी निवड केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number