वीज कर्मचाऱ्यांचे राज्यभरात आंदोलन

पालघर महाराष्ट्र विज महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यात ३९ संघटनांनी हे काम बंद आंदोलन पुकारले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मेस्मा लावून सरकार आमची गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. तसेच आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा […]

वीज कर्मचाऱ्यांचे राज्यभरात आंदोलन

पालघर महाराष्ट्र विज महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यात ३९ संघटनांनी हे काम बंद आंदोलन पुकारले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मेस्मा लावून सरकार आमची गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. तसेच आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांकडून देण्यात आला

देशव्यापी संपात अंगणवाडी आणि आशा सेविकांचा सहभाग

केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात सोमवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात बारामती औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतलाय. या संपात बारामती एमआयडीसीमधील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले कामगार कायदे रद्द करावे सोबत अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर देखील या संपात सहभागी झाल्या होत्या. या सर्व कामगारांनी बारामतीतील प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली सोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगार धोरणाचा घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number