Pope Francis : 88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक; मात्र, जीवाला धोका नाही

पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती समोर आली आहे. पोप फ्रान्सिस यांना श्वसनाशी संबंधित समस्या येत आहेत. त्यांची स्थिती गंभीर असली तरी त्यांच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टर म्हणाले.

Pope Francis : 88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक; मात्र, जीवाला धोका नाही

Pope Francis : पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती समोर आली आहे. पोप फ्रान्सिस यांना श्वसनाशी संबंधित समस्या येत आहेत. त्यांना न्यूमोनिया झाला आहे. तसंच मागच्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजन दिला जातो आहे. 14 फेब्रुवारीला पोप फ्रान्सिस यांना रोमच्या जेमेली पॉलिक्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

हेही वाचा – Hajj 2025 : हज यात्रेत लहान मुलांवर बंदी, व्हिसाचे नियम कडक, नवीन पेमेंट सिस्टम – सौदी अरेबिया

88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांच्यावर जेमेली रुग्णालयात उपचार सुरु
88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या आठवड्यापासून रोमच्या जेमेली पॉलिक्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ते त्यांच्या नियमित प्रार्थना करू शकत नाहीत. पोप आजारी असल्याने आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने व्हॅटिकनमधील सध्याची परिस्थिती काहीशी गंभीर आहे.

दरम्यान, सध्या त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि व्हॅटिकनमधील त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांनीही पोप नियमित जेवण आणि झोप घेत असल्याचं सांगितले. तसेच, त्यांची स्थिती गंभीर असली तरी त्यांच्या जीवाला धोका नसल्याचंही ते म्हणाले. मात्र, उपचारांचा परिणाम होण्यासाठी आणि पोप फ्रान्सिस यांची प्रकृती सुधारण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

पोप फ्रान्सिस यांची तब्येत नाजूक स्थितीत
पोप फ्रान्सिस यांना मागील आठवड्यात शुक्रवारी रोम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि त्यांची वैद्यकीय स्थिती नाजूक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जोपर्यंत आवश्यकता वाटेल तोपर्यंत ते रुग्णालयातच राहतील, असे व्हॅटिकन सिटीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं. ब्राँकायटिससंदर्भातील चाचण्या आणि उपचार करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आलं. आता पोप यांना न्युमोनिया झाल्याचं व्हॅटिकनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. त्यानंतर प्रकृतीबाबत पुन्हा अपडेट देण्यात आलं. त्यानंतर पोप यांच्यावर ठरलेले उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं तसंच त्यांना ताप नसल्याचं सांगण्यात आलं. तसंच त्यांनी सोमवारी रुग्णालयात काही काम आणि वाचन केल्याचंही सांगितलं गेलं होतं. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – World Record : हे आहेत 100 हून अधिक नातवंडे असलेले आजी-आजोबा! ब्राझीलच्या जोडप्याचा वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम

12 वर्षांच्या काळात पोप अनेकदा रुग्णालयात
रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करताना 12 वर्षांच्या काळात पोपना अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. त्यांना त्याआधीच्या जीवनातही अनेक वैद्यकीय समस्यांचा सामनाही करावा लागला आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं होतं. मार्च 2023 मध्ये त्यांना ब्राँकायटिसमुळंच तीन दिवस रुग्णालयात दाखल राहावं लागलं होतं. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. आणखी एका आजारपणामुळं त्यांना 2023 मध्ये यूएईमध्ये झालेल्या हवामान परिषदेलाही उपस्थित राहता आलं नव्हतं.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हनुवटीला जखम
डिसेंबर महिन्यात सेंट पीर्ट्स बॅसिलिका याठिकाणी कॅथलिक कॉर्डिनलसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, त्यांच्या हनुवटीवर एका जखमेचे व्रणही दिसले होते. पडल्यामुळं झालेल्या लहानशा अपघातात ती जखम झाल्याचं नंतर व्हॅटिकनकडून सांगण्यात आलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number