राजकीय नेते येणार एकाच व्यासपिठावर

  देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन पालखी मार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त राज्यातील राजकीय नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकीय नेते एकाच व्यासपीठावर सोबत येणार आहेत.   दरवर्षी लाखो भक्त देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. […]

राजकीय नेते येणार एकाच व्यासपिठावर

  देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन पालखी मार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त राज्यातील राजकीय नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकीय नेते एकाच व्यासपीठावर सोबत येणार आहेत.

  दरवर्षी लाखो भक्त देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मात्र कोरोनामुळे या भूमिपूजन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले नाही. यावर्षी वारीदरम्यान वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी या मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंढरपूरमधील रेल्वे मैदानावर होणार आहे.

  या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार  उपस्थित राहणार असल्याचे प्रशांत परिचारक यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number