मंत्रिमंडळ विस्ताराआधी चार मंत्र्यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नेत्यांना संधी देण्यात येणार असून, […]

मंत्रिमंडळ विस्ताराआधी चार मंत्र्यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.

आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नेत्यांना संधी देण्यात येणार असून, शपथविधी सोहळ्याआधी मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चूही देण्यात येत आहे. यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्या मंत्रिमंडळात ४३ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून नवे मंत्री आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number