पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणार

2016 आणि 2019 नंतर पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबियाचा हा तिसरा दौरा असेल. 2023 मध्ये, सौदी अरेबियाचे युवराज नवी दिल्लीच्या राजकीय भेटीवर आले होते.

पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणार
Edited Image

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सौदीचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान महामहिम प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांना या भेटीसाठी आमंत्रित केले आहे. 2016 आणि 2019 नंतर पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबियाचा हा तिसरा दौरा असेल. 2023 मध्ये, सौदी अरेबियाचे युवराज नवी दिल्लीच्या राजकीय भेटीवर आले होते. त्यांनी G20 शिखर परिषदेला हजेरी लावली होती आणि भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. 

भारत आणि सौदी अरेबियाचे मैत्रीपूर्ण संबंध –  

भारत आणि सौदी अरेबियामध्ये जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांमधील सामाजिक-सांस्कृतिक आणि व्यापारी संपर्कांचा मोठा इतिहास आहे. धोरणात्मक भागीदार म्हणून, नवी दिल्ली आणि रियाध यांच्यात राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संपर्क यासह विविध क्षेत्रात मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत.

हेही वाचा – Time 100 List: टाईम मासिकाच्या टॉप 100 यादीत ट्रम्प आणि युनूसची नावे; एकाही भारतीयाला मिळालं नाही स्थान 

दरम्यान, पंतप्रधानांच्या या भेटीतून भारताने सौदी अरेबियासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना दिलेले महत्त्व दिसून येते. यामुळे दोन्ही देशांमधील बहुआयामी भागीदारी अधिक सखोल आणि मजबूत करण्याची तसेच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल.

हेही वाचा – कोण हा निकिता कॅसप? आई-वडिलांची हत्या करून डोनाल्ड ट्रम्पना मारण्याचा कट; 17 वर्षीय तरुणाला अटक

पंतप्रधान मोदींचा हा दौरा पुढील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यापूर्वी होत आहे. भारत आणि सौदी अरेबियाने 1947 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number