PM Narendra Modi: ”झूठ की गूंज’ने अर्थव्यवस्थेची घौडदौड थांबणार नाही’; 7.8 टक्के विकासदराचा हवाला देत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या अभियानावर नाव न घेता निशाणा साधला.

PM Narendra Modi: ”झूठ की गूंज’ने अर्थव्यवस्थेची घौडदौड थांबणार नाही’; 7.8 टक्के विकासदराचा हवाला देत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

PM Modi Instagram video Swipe Rahul Gandhi calling ‘Jhooth Ki Goonj’: बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेसाठी उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक सेल्फी-स्टाइल व्हिडिओ पोस्ट करत देशाच्या मजबूत आर्थिक स्थितीचे दर्शन घडवले आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीचा (GDP) दर 7.8 टक्क्यांवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा संदेश दिला. परदेशात असताना देशांतर्गत आर्थिक प्रगतीवर भाष्य करण्याची ही अत्यंत दुर्मिळ वेळ ठरली असून त्यांनी Gen Z आणि तरुण पिढीशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

‘झूट की गूंज’वरून राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टोला
या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या अभियानावर नाव न घेता निशाणा साधला. देशात सर्वत्र ‘झूठ की गूंज’ आणि निराशेचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, 7.8 टक्के विकासदराने या सर्व खोट्या प्रचाराचा पर्दाफाश केला आहे, असा टोला त्यांनी लगावला. ‘7.8 टक्के विकासदर, मजबूत आकडेवारी आणि त्याहूनही मजबूत आत्मविश्वास!’ अशा कॅप्शनसह पंतप्रधान मोदींनी हा सुमारे 3 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

जागतिक संकटांच्या काळात भारताची अभूतपूर्व प्रगती
सध्या संपूर्ण जग युद्ध, पुरवठा साखळीतील खंड आणि कोविड-19 महामारीनंतरच्या अनिश्चिततेने वेढलेले असतानाही भारताने ही मोठी झेप घेतली असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) 7 टक्क्यांच्या अंदाजाला मागे टाकत रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त विकासदर भारताने साध्य केला आहे. मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने हा मैलाचा दगड गाठला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – SIR Voter List : मतदारांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीतील 47 लाख मतदार SIR ड्राफ्टमधून वगळली? यादीत तुमचं नाव आहे का, लगेच चेक करा

स्वदेशीचा नारा: ‘वेड इन इंडिया’ आणि परदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला अधिक बळ देताना पंतप्रधानांनी नागरिकांना परदेशी प्रवास, अनावश्यक सोने खरेदी आणि डेस्टिनेशन वेडिंग टाळण्याचे आवाहन केले. ‘आपल्याला स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘वेड इन इंडिया’ या मंत्रांचे पालन करावे लागेल. गरज नसेल तर सोने खरेदी करणे टाळा,’ असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तरुण पिढीच्या भविष्यासाठी स्वयंपूर्णतेचा पाया
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनांनंतर तरुण पिढीशी सुसंवाद वाढवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींच्या या सोशल मीडिया पोस्टकडे पाहिले जात आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा तरुण पिढीच्या हाती एक समृद्ध आणि विकसित भारत सोपवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. नकारात्मकता पसरवणाऱ्यांना उघडे पाडत देशातील तरुणांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी आपल्या संदेशाच्या अखेरीस केले.

हेही वाचा – Indian Standard Time: आता संपूर्ण देशात चालणार एकच ‘सरकारी घड्याळ’; IST अनिवार्य करणाऱ्या नव्या नियमांमुळे काय बदलणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number