PM Kisan Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळे पीएम किसानचा पुढील हप्ता खात्यात जमा होण्यास येऊ शकतात अडचणी

महसूल विभागाकडील जमिनीच्या नोंदी आणि पीएम किसान पोर्टलवरील माहितीमध्ये फरक असल्यास लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

PM Kisan Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळे पीएम किसानचा पुढील हप्ता खात्यात जमा होण्यास येऊ शकतात अडचणी

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम वेळेवर जमा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तांत्रिक त्रुटी, कागदपत्रांमधील विसंगती आणि बँक खात्याशी संबंधित काही प्रक्रिया अपूर्ण असल्याने हा निधी अडकण्याची शक्यता आहे.

पीएम किसानचा हप्ता अडकण्यामागे नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या नोंदी तपासणे गरजेचे आहे. महसूल विभागाकडील जमिनीच्या नोंदी आणि पीएम किसान पोर्टलवरील माहितीमध्ये फरक असल्यास लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय e-KYC प्रक्रिया पूर्ण नसणे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसणे किंवा बँक खाते DBT साठी सक्रिय नसणे, हीदेखील हप्ता रखडण्याची प्रमुख कारणे आहेत.

हेही वाचा – Paresh Rawal on Tukaram Mundhe Transefer: बोलबाला तुकाराम मुंढेंचाच! अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष मागणी, म्हणाले, 'खात्यातून बदली किंवा हकालपट्टी…' 

जमिनीचे प्रमाणीकरण (Land Seeding) पूर्ण आहे का?

पीएम किसानचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी जमिनीची नोंद आणि लाभार्थ्याची माहिती योग्य असणे आवश्यक आहे. Land Seeding अर्थात जमिनीचे प्रमाणीकरण पूर्ण नसेल, तर हप्ता प्रलंबित राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची माहिती पोर्टलवरील नोंदीशी जुळते का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांनी काय तपासावे?

शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन Beneficiary Status तपासावा. e-KYC पूर्ण आहे का, आधार-बँक लिंकिंग झाले आहे का आणि DBT सुविधा कार्यरत आहे का, याची खात्री करावी. माहितीमध्ये त्रुटी असल्यास जवळच्या CSC केंद्रात किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन दुरुस्ती करून घ्यावी. तांत्रिक कारणामुळे पात्र लाभार्थ्याचे नाव निष्क्रिय किंवा अपात्र झाले असल्यासही दुरुस्तीची संधी उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात अर्ज केल्यानंतर पडताळणी करून पात्रता पूर्ववत करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number