नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा 22 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट हस्तांतरित केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, यावेळी नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामची राजधानी गुवाहाटी येथून या हप्त्याचे वितरण करणार आहेत. सायंकाळी सुमारे पाच वाजता आयोजित कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होईल. या हप्त्याद्वारे केंद्र सरकार सुमारे 18,640 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठवणार आहे.
ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. अधिकृत आकडेवारीनुसार, योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी दोन कोटींपेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी द्वारा प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (PM-KISAN) की 22वीं किस्त के तहत 9 करोड़ 32 लाख से अधिक किसानों के बैंक खातों में ₹18,640 करोड़ से अधिक की धनराशि का हस्तांतरण किया जाएगा। सिर्फ 1 दिन शेष!
?️ 13 मार्च, 2026 #AgriGoI #PMKisan pic.twitter.com/VcOj8DnBcE — PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) March 12, 2026
हेही वाचा: Vasai Fish Viral Video : वसईकरांनो, मासे खाताय तर सावधान..! मासळीवर चक्क लाल हिटची फवारणी
दरम्यान, गेल्या काही काळात या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या थोडी कमी झाल्याचे दिसून आले आहे. पूर्वी सुमारे 10 कोटी 48 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता, मात्र आता ही संख्या सुमारे नऊ कोटी 35 लाखांवर आली आहे. यामागे काही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. त्यामध्ये योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरलेले लाभार्थी, आधार किंवा बँक खात्याची चुकीची माहिती आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणे ही मुख्य कारणे आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ते मिळणार नाहीत.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने चेहरा ओळख प्रणालीवर आधारित मोबाइल अॅप देखील सुरू केले आहे. या अॅपच्या मदतीने शेतकरी ओटीपी किंवा बायोमेट्रिक मशीनशिवाय घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकतात. तसेच जवळच्या सीएससी केंद्र किंवा किसान सेवा केंद्रावर जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
शेतकऱ्यांना त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हेही सहज तपासता येते. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करावे लागते. त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गावाची माहिती भरल्यावर गावातील लाभार्थ्यांची यादी दिसते. त्याचप्रमाणे लाभार्थी स्थिती पर्यायातून आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही हेही तपासता येते.
यामुळे देशातील लाखो शेतकरी घरबसल्या त्यांच्या खात्यात जमा झालेल्या निधीची माहिती सहज तपासू शकतात.