PM Aasha Scheme: भरघोस उत्पादन झालं पण भाव पडला? काळजी नको! सरकार देणार तुमच्या कष्टाचा पूर्ण मोबदला

पीएम-आशा योजना शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देत त्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करते. बाजारभाव कमी असतानाही सरकारी हस्तक्षेपामुळे नुकसान टळते.

PM Aasha Scheme: भरघोस उत्पादन झालं पण भाव पडला? काळजी नको! सरकार देणार तुमच्या कष्टाचा पूर्ण मोबदला

शेतीत सर्वात मोठी चिंता पिक उत्पादनाची नसते, तर त्याला योग्य भाव मिळवण्याची असते. भरघोस उत्पादन झाल्यास बाजारात दर घसरतात आणि शेतकऱ्यांना खर्चही वसूल करणे कठीण जाते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना अधिक बळकट केली आहे.

योजनेचा मुख्य उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळवून देणे आणि बाजारातील दरांच्या चढ-उतारांपासून त्यांचे संरक्षण करणे हा आहे. आता शेती हा केवळ जोखमीचा व्यवसाय राहिलेला नाही, कारण सरकारने किमान आधारभूत किंमतीची हमी प्रत्यक्षात आणण्यासाठी मजबूत सुरक्षा कवच उभे केले आहे.

हेही वाचा: Ashok Kharat Case : मोठी बातमी! पत्नीनंतर आता खरातचा मुलगा गायब, फोनही नॉट रीचेबल; खरात प्रकरणाला वेगळं वळण

वाढलेला खरेदी कोटा

पीएम-आशा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी जाहीर केलेल्या दराचा पूर्ण लाभ दिला जातो. विशेषतः डाळी, तेलबिया आणि नारळ अशा पिकांसाठी खरेदीचा कोटा वाढवण्यात आला आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खरेदीची मर्यादा 25 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनाचा मोठा हिस्सा सरकारी दराने विकू शकतात.

बाजारभाव कमी असला तरी संरक्षण

या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, जर बाजारभाव हमी भावापेक्षा  कमी असेल, तर सरकार थेट हस्तक्षेप करून पिकांची खरेदी करते किंवा फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील दलालांवर अवलंबून राहावे लागत नाही आणि त्यांच्या उत्पन्नाला स्थिरता मिळते.

हेही वाचा: US Iran Conflict: इराण-अमेरिका युद्धाचा भडका! ट्रम्प यांचा तेहरानवर मोठ्या हल्ल्याचा दावा

योजना तीन प्रमुख मॉडेल्सवर कार्य करते:

प्राइज सपोर्ट स्कीम: सरकारी संस्था थेट पिकांची खरेदी करतात.
प्राइज डेफिशियन्सी पेमेंट स्कीम: बाजारभाव आणि एमएसपीमधील फरक थेट खात्यात जमा होतो.
प्रायव्हेट प्रोक्युरमेंट अँड स्टॉकिस्ट स्कीम: खासगी कंपन्यांना खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जाते.

नोंदणी प्रक्रिया सोपी आणि डिजिटल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या कृषी पोर्टलवर किंवा पीएम-आशाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोपी करण्यात आली आहे. यासाठी जमीन कागदपत्रे, बँक पासबुक आणि आधार कार्ड यांसारखी मूलभूत माहिती द्यावी लागते. नोंदणी झाल्यानंतर पिकांची पडताळणी केली जाते. त्यानंतर शेतकरी त्यांचे उत्पादन सरकारी खरेदी केंद्रांवर विकू शकतात. खरेदी केंद्रांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर दिली जाते.

योग्य वेळी नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना थेट सरकारी लाभ मिळतो आणि मध्यस्थांची भूमिका मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला स्थिरता मिळते आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत होते.

एकूणच, पीएम-आशा योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करणारी, बाजारातील जोखीम कमी करणारी आणि शेतीला अधिक सुरक्षित व फायदेशीर बनवणारी महत्त्वाची योजना ठरत आहे. 

हेही वाचा: Unseasonal Rain: 'हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला'; राज्यातील 29 जिल्ह्यांत निसर्गाचे तांडव, दोन लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number