रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दुतावासाने योजना आखली आहे. युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुमी शहर सोडण्यास तयार राहण्याच्या सूचना भारतीय दुतावासाने दिल्या आहेत.
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ट्विट केले की, ‘युक्रेनमधील सुमी शहरामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोल्टावामार्गे पश्चिम सीमेपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी प्लोटावा शहारातील भारतीय दूतावासाची टीम तैनात आहे. ही योजना राबवण्याची वेळ आणि तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्यांनी सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुमी शहर सोडण्यास तयार राहण्याच्या सूचना भारतीय दुतावासाने दिल्या आहेत.
Team from Embassy of India is stationed in Poltava City to coordinate the safe passage of Indian students stranded in Sumy to Western borders via Poltava.
Confirmed time & date will be issued soon. 🇮🇳n students advised to be ready to leave on short notice.@MEAIndia @opganga — India in Ukraine (@IndiainUkraine) March 6, 2022
रशिया-युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. तर या युद्धामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी रशियामध्ये अडकले आहेत. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरुप परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात येत आहे. तरीही अद्याप अनेक विद्यार्थी युक्रेनमधील सुमी शहरात अडकले असून विद्यार्थी आपल्या सुटकेसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे शहरात अन्नाचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थ्यांना तहान भागवण्यासाठी बर्फ वितळण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.