Digital payment: आता PhonePe वर पैसे पाठवणं होणार अगदी सोपं, फक्त बोलून करा पेमेंट; कसं ते जाणून घ्या

फोनपेने AI-पॉवर्ड नॅचरल लँग्वेज फीचर आणले आहे. आता युजर्स फक्त बोलून पैसे पाठवू शकतात

Digital payment: आता PhonePe वर पैसे पाठवणं होणार अगदी सोपं, फक्त बोलून करा पेमेंट; कसं ते जाणून घ्या

PhonePe: फोनपेने (PhonePe) आपल्या वापरकर्त्यांसाठी डिजिटल पेमेंट अनुभव आणखी सोपा करण्यासाठी नवीन AI-पॉवर्ड फीचर लॉन्च केले आहे. आता युजर्सना केवळ मजकूर टाइप करणे नाही तर व्हॉइस कमांडचा वापर करूनही पेमेंट, रिचार्ज, किंवा इतर अ‍ॅपमधील कामे सहज करता येणार आहेत. या नव्या फीचरमुळे युजर्सना पारंपरिक नेव्हिगेशनमध्ये वेळ घालवण्याची गरज नाही. तुम्हाला जे करायचं आहे, ते फक्त सांगताच फोनपे AI त्याचा हेतू समजून थेट योग्य इंटरफेस उघडतो. उदाहरणार्थ, तुम्ही “हेमंतला 20 रुपये पाठवा” किंवा “Fastag रिचार्ज करा” अशी कमांड दिली, तर अॅप आपोआप त्या कार्यासाठी स्क्रीन उघडतो आणि पुढील स्टेप्ससाठी मार्गदर्शन करतो.

हे फीचर मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीच्या AI तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये ऑन-डिव्हाईस आणि क्लाउड-आधारित प्रोसेसिंगचा हायब्रिड मॉडेल वापरण्यात आला आहे, ज्यामुळे युजर्सचा सर्व डेटा सुरक्षित राहतो आणि वैयक्तिक माहिती बाहेर जात नाही. फीचर वापरकर्त्यांच्या हेतू ओळखते आणि त्यानुसार अ‍ॅपमधील योग्य क्रिया सुरू करते, त्यामुळे पेमेंट प्रक्रिया अगदी सहज होते. फोनपेचे CTO राहुल चारी यांनी सांगितले की, “हे AI-पॉवर्ड फीचर फक्त इनपुट ओळखत नाही, तर युजर्सच्या हेतू समजून त्यांच्या गरजांनुसार सेवा पुरवते. गोपनीयता आणि सुरक्षिततेमध्ये कुठलाही तडजोड न करता युजर्सला मूल्य मिळते.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, हे फीचर पारंपरिक पेमेंट टूल्सपेक्षा अधिक बुद्धिमान इंटरफेस तयार करते, जे डिजिटल व्यवहारांना सोपे आणि जलद बनवते.

हेही वाचा: WhatsApp update: व्हॉट्सॲपचा नवा धमाका! आता तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता शेड्यूल; नवीन फिचर कसे वापरायचे जाणून घ्या

मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष पुनीत चंडोक यांनी फोनपेच्या AI क्षमतांचा पाठिंबा दिला आणि सांगितले की, “मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीच्या तंत्रज्ञानामुळे फोनपे युजर्ससाठी सुरक्षित आणि स्केलेबल डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स सादर करण्यास सक्षम झाला आहे.”या नव्या फीचरमुळे फोनपे अ‍ॅपमधील ग्लोबल सर्च बार, हेल्प सेंटर आणि हिस्ट्री टॅब वापरून सर्व कामे सहज करता येतील. तुम्हाला पैसे पाठवायचे असतील, बिल भरायचे असतील किंवा कोणतीही माहिती हवी असेल, आता फक्त बोलून आदेश द्या, AI बाकीची प्रक्रिया सांभाळेल.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number