Petrol Disel Rate Today: कच्च्या तेलाचा भडका! 100 डॉलरचा टप्पा पार; भारतात पेट्रोल महागणार? जाणून घ्या आजचे दर

होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली.

Petrol Disel Rate Today: कच्च्या तेलाचा भडका! 100 डॉलरचा टप्पा पार; भारतात पेट्रोल महागणार? जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मंगळवार, 17 मार्च 2026 रोजी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये दोन क्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आज देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.

इराणमधील युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली. ब्रेंट क्रूडची किंमत 102.69 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे, तर अमेरिकन क्रूड 95.92 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारात दर वाढले असले तरी भारतीय तेल कंपन्यांनी आज देशांतर्गत पातळीवर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजता जाहीर केलेल्या दरांनुसार देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये दराने विकले जात आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 90.03 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल 105.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.02 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 100.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

हेही वाचा: Gulveer Singh Creates History: न्यूयॉर्कमध्ये तिरंगा फडकला! गुलवीर सिंगने मोडला राष्ट्रीय विक्रम; हाफ मॅरेथॉनमध्ये रचला इतिहास

पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज बदलण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, केंद्र व राज्य सरकारांकडून आकारले जाणारे कर (VAT आणि एक्साईज ड्युटी) तसेच तेल शुद्धीकरणाचा खर्च या सर्व घटकांचा दरांवर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात इंधनाच्या किमती वेगवेगळ्या असतात.

दरम्यान, नागरिकांना त्यांच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर घरबसल्या तपासण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन दर तपासता येतात.

याशिवाय SMS च्या माध्यमातूनही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेता येतात. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP City Code लिहून 9224992249 या क्रमांकावर संदेश पाठवावा. भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांनी RSP लिहून 9223112222 वर संदेश पाठवावा. तर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ग्राहकांनी HP Price लिहून 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवल्यास तुमच्या शहरातील इंधनाचे दर कळू शकतात.

हेही वाचा: ATS Arrested Student : ISIS मॉड्युल चालवणाऱ्या विद्यार्थ्याला अटक; पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात असल्यानं एटीएस पथकाची कारवाई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number