विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आजपासून नाशिकमध्ये संवाद दौऱ्यावर आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादी पक्षातून जाणाऱ्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर देशात मंदी असल्यामुळे चिंताजनक वातावरण असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच भाजपा इनकमिंगवर बोलत भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे संवाद कार्यक्रमात ?
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या नाशिकमध्ये संवाद कार्यक्रम घेत आहेत.
यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादी पक्षातून जाणाऱ्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशात मंदीचे वातावरण असून घरी आल्यावर पत्नी पतीला नोकरी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करते, अशी वेळ महिलांवर आली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बॉश कंपनी ,महिंद्रा कंपनीमध्ये कामगारांची कपात केली जात असून सरकार असंवेदनशील असल्याचे म्हटलं आहे.
विरोधी पक्षातील नेते भाजपात प्रवेश करत असल्यामुळे आमचा माणूस तुमच्याकडे आल्यावर साफ सुथरा होतो असे कुठले वॉशिंग पावडर वापरतात.
त्यावर मुख्यमंत्री म्हणतात आमच्याकडे डॅशिंग रसायन असल्याचे म्हटलं.
सगळी रसायन चांगली नसतात असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
संपूर्ण जगात रसायन बॅन असून त्यांच्याकडे जाणाऱ्यांनो सावध रहा.
रसायनाचा विकास हवा की आमचा विकास हवा असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
नोकऱ्या जात असल्यामुळे माझ्याकडे बायोडेटा पाठवा. मी मुख्यमंत्र्यांना पाठवते आणि नोकरी लावण्यास सांगते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी नोकऱ्या लावल्या तर मी स्वत:च आभार मानने असेही मुख्यमंत्री म्हणाले.