आता Paytm Payment करताना UPI PIN टाकायची गरज नाही, आलं भन्नाट फिचर

हे नवीन अपडेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार आले आहे, जे 1 एप्रिलपासून लागू झाले असून, त्यानुसार सर्व डिजिटल व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य आहे.

आता Paytm Payment करताना UPI PIN टाकायची गरज नाही, आलं भन्नाट फिचर

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने आपल्या वापरकर्त्यांसाठी दोन आकर्षक वैशिष्ट्ये सादर केली आहेत, ज्यामुळे पैशांचे व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. वापरकर्ते आता UPI पेमेंटसाठी फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट वापरू शकतात आणि कार्डशिवाय एटीएममधून रोख रक्कम काढू शकतात. हे नवीन अपडेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार आले आहे, जे 1 एप्रिलपासून लागू झाले असून, त्यानुसार सर्व डिजिटल व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य आहे.

Paytm च्या या नवीन फीचरमुळे, तुम्हाला आता प्रत्येक वेळी तुमचा UPI पिन टाकण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या फेस आयडी किंवा फिंगरप्रिंटचा वापर करून तुमच्या पेमेंटची पुष्टी करू शकता. हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्हीवर काम करते.

पेटीएमने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वापरकर्त्यांचा बायोमेट्रिक डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. हा डेटा पेटीएम किंवा बँकेकडे साठवला जात नाही. तो केवळ तुमच्या फोनमध्ये साठवला जातो. तथापि, या सुविधेचा वापर करून एका वेळी जास्तीत जास्त 5,000 रुपये भरता येतात. याशिवाय, वापरकर्ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा UPI पिन वापरणे सुरू ठेवू शकतात.

तुमच्या फोनवर बायोमेट्रिक फीचर कसे चालू कराल?

– Paytm ॲप उघडा आणि प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

– सेटिंग्जमध्ये जा.

– येथे तुम्हाला 'Pay with Fingerprint' किंवा 'Pay with Face ID' यापैकी एक पर्याय दिसेल. यापैकी एक निवडा.

– आता, तुमचे बँक खाते निवडा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा.

– यानंतर, तुम्ही सहजपणे बायोमेट्रिक पेमेंट करू शकाल.

तसेच पेटीएमने कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला डेबिट कार्डची गरज नाही. युजर्स आता एटीएम स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करून, फेस आयडी, फिंगरप्रिंट किंवा UPI पिन वापरून रोख रक्कम काढू शकतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number