‘पक्षातील वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी’

मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तर, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला. आणि त्यानंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’ या वर्तमानपत्राच्या अग्रेलाखातून भाष्य करण्यात आलं आहे. पक्षातील वारसदार निर्माण करण्यात शरद […]

‘पक्षातील वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी’

मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तर, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला. आणि त्यानंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’ या वर्तमानपत्राच्या अग्रेलाखातून भाष्य करण्यात आलं आहे. पक्षातील वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले असल्याचे भाष्य करत पवारांवर निशाणा साधला आहे.

‘शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार असे समाकरण आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि आजवर टिकवला आहे. मात्र, शरद पवारांच्या नंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच आहे. पवार यांच्या शब्दाला राजकारणात मान आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेणारा वारस शरद पवार निर्माण करू शकले नाहीत. यामध्ये शरद पवार अपयशी ठरले, असं म्हणत सामना दैनिक वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला.’

‘शरद पवारांनी पक्ष पुढे नेणारा वारस निर्माण केला नाही आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रे, पक्ष चांगलाच हादरला. यापुढे आपले कसे होणार, अशा पेचात सर्व राष्ट्रवादी नेते पडले. तर, शरद पवारांनी राजीनामा पुन्हा मागे घेण्यासाठी नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवून रस्त्यावर उतरले. त्यामुळे अखेर शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा लागला, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.’

तसेच, भाजपाला शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडायचा होता. लोक बॅगा भरून तयार होते. येणाऱ्यांच्या लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्थाही पूर्ण झाली होती. मात्र, शरद पवारांच्या खेळीने भाजपाची खेळी कचऱ्यात गेली. शरद पवार आल्याने भाजपाचे लॉजिंग बोर्डिंग रिकामेच राहिले, अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number