‘ट्विटर, फेसबुकवरून हटवलं पक्षाचं चिन्ह’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. […]

‘ट्विटर, फेसबुकवरून हटवलं पक्षाचं चिन्ह’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. यातच आता पक्ष चिन्हाचा फोटो हटवल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजप उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांना धक्का देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत का? अजित पवार हे अस्वस्थ आहे का? असे विविध सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. आणि असे असतांना अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढून टाकला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number