पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जवळ आहे. मुलांच्या परीक्षा शाळा आणि शिक्षण या सर्व गोष्टींचं आई वडिलांना खुप काळजी असते. त्यातच आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. भेटी मागचं कारणही तेवढं महत्वाचं आहे. दहावीच्या परिक्षेत पेपर सोडवण्याचा वेळ वाढवून द्यावा या मागणीसाठी पालकांचे शिष्टमंडळ यांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची यांची भेट घेतली आहे. […]

पालकांनी घेतली राज ठाकरेंची  भेट

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जवळ आहे. मुलांच्या परीक्षा शाळा आणि शिक्षण या सर्व गोष्टींचं आई वडिलांना खुप काळजी असते. त्यातच आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. भेटी मागचं कारणही तेवढं महत्वाचं आहे. दहावीच्या परिक्षेत पेपर सोडवण्याचा वेळ वाढवून द्यावा या मागणीसाठी पालकांचे शिष्टमंडळ यांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची यांची भेट घेतली आहे. मागणी अगदी रास्त आहे.

गेली दोन वर्ष कोव्हीड काळात ऑनलाईन परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेचा सराव राहिला नाही. त्यांच्या लिहिण्याचा सराव कमी झाल्याने पेपर सोडवण्यासाठी वेळ लागू शकतो. लिहिण्याचा स्पीड कमी झाल्याने दिलेला वेळ विद्यार्थ्यांना कमी पडू लागल्याचा दिसून येत आहे. आणि याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या सराव परिक्षेत दिसून आला आहे. गुणांची टक्केवारी कमालीची घसरत आहे असं पालकांचं म्हणण आहे. आणि याच विद्यार्थ्यांच्या काळजी पोटी पालकांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आता यावर राज ठाकरे सरकारशी चर्चा करून काय निर्णय घेणार हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number