‘परमबीर सिंह यांनी आयुक्तपदाचा दुरुपयोग केला’ – विनायक राऊत

निवृत्त एस.ए.पी. समशेर पठाण यांनी परमवीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, त्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. परमबीर सिंह यांनी आपल्या आयुक्त पदाचा दुरुपयोग करून अनेक गैरव्यवहार केले असल्याचे आता सिद्ध झाले. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांना दुर्लक्ष करता येणार नाही. परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी […]

‘परमबीर सिंह यांनी आयुक्तपदाचा दुरुपयोग केला’ – विनायक राऊत

निवृत्त एस.ए.पी. समशेर पठाण यांनी परमवीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, त्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. परमबीर सिंह यांनी आपल्या आयुक्त पदाचा दुरुपयोग करून अनेक गैरव्यवहार केले असल्याचे आता सिद्ध झाले. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांना दुर्लक्ष करता येणार नाही. परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

निवृत्त एस.ए.पी. समशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी होण्यची आवश्यकता असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. तसेच पठाण यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने यापूर्वीही परमबीर सिंह यांना हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांसमोर हजर न राहिलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले होते.

परमबीर सिंह मुंबईत दाखल

खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मात्र फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. तब्बल २३१ दिवसांनी परमबीर सिंह मुंबईत चौकशीसाठी हजर झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number